छत्रपती संभाजी भोसले कौटुंंबिक माहिती

छत्रपती संभाजी भोसले कौटुंंबिक माहिती

भोसले घराणे

सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले.

बाबाजी भोसले (जन्म १५३३)  : त्याचे दोन पुत्र मालोजी  आणि विठोजी

मालोजी भोसले(१५४२-१६१९) : त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या.

मालोजीस दोन पुत्र होते : शहाजी  आणि शरीफजी .

विठोजी भोसले : बाबाजी भोसले त्याचे द्वितीय पुत्र विठोजी त्यांची पत्नी आउ बाइ. याना १ कन्या. अम्बिकाबाइ . ८ पुत्र .

१ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी.  विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले.

शरीफजी : मालोजी भोसले त्याचे पुत्र शरीफजी. पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.

शहाजी : (१५९४-१६६४) मालोजी भोसले त्याचे पुत्र शहाजी.  प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.  मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते. शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.शहाजीराजास जिजाबाई , तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन बायका होत्या संभाजी कर्नाटकात शहाजीजवळ राहत असे. कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच तो वारला. एकोजीने शहाजीनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली. शहाजीने शिवाजीला १६४१ मध्ये जिजाबाई समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले.तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी (तंजावर राज्याचा संस्थापक). या तिघांनी पुढे इतिहासात नाव कमावले.

जिजाबाई  (इ.स. १५९८१७ जून, इ.स. १६७४)  : ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. लखुजी जाधवशहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

शिवाजी महाराज:  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी )१६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले.

कौटुंंबिक माहिती

 1. सईबाई निंबाळकर (१६३३ – ५ सप्टेंबर १६५९) : या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या आई होत्या. सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती. सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह पुण्यातील लालमहाल येथे १६ मे, १६४१रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे होत तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी १४ मे ,१६५७ रोजी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर, १६५९ रोजी सईबाईंचा मृत्यू झाला. मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून “सई” हा शेवटचा शब्द निघाला होता.
 2. सोयराबाई मोहिते : सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या आई, छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी राजेंच्या एवजी राजे राजाराम यांस गादी मिळावी म्हणून कटकारस्थाने रचल्याचे प्रवाद आहेत.
 3. पुतळाबाई पालकर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी. पुतळाबाई ,शिवाजी महाराजांची तिसरी पत्नी होय.१६५३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पुतळाबाई ही पालकर घराण्याची स्त्री होय. नेताजी पालकर् हे पुतळाबाईंचे सम्भधीक होते. शिवाजीमहाराजांच्या मृत्युनंतर् त्या सती गेल्या. त्या निपुत्रिक होत्या.
 4. लक्ष्मीबाई विचारे.
 5. काशीबाई जाधव .
 6. सगणाबाई शिंदे : राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
 7. गुणवंतीबाई इंगळे
 8. सकवारबाई गायकवाड वा कमळाबाई (सकवारबाईची कन्या), सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी) , अंबिकाबाई महाडीक, दीपाबाई, राणूबाई पाटकर कन्या होत्या.

छत्रपती संभाजी भोसले:

संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.

१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तोनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या. अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाहीत, हे लक्षात घेणे गरजेचं आहे .गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जीभ कापण्याची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.

छ. राजाराम : पत्नी : १. ताराबाई (१६७५-१७६१) ———>पुत्र- शिवाजी(१६९६-१७२६) , २.जानकीबाई , ३.राजसबाई ——> पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०) , ४.अम्बिकाबाई (सती गेली) ,५. सगुणाबाई .

राजारामाचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.

छत्रपती शिवाजींचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी: छत्रपती शिवाजींचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी याने तंजावरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५ मध्ये हे राज्य मिळवले. आदिलशाहीच्या अंकित असे हे राज्य होते. शिवाजींच्या कर्नाटकावरील मोहिमेत एकोजीने मैत्रीऐवजी शत्रुत्वाची भूमिका घेतल्यामुळे त्याला शिवाजींविरुद्ध पराभूत होऊन पळून जावे लागले; तथापि शिवाजींनी उदार मनाने त्याचे राज्य अबाधित ठेवले. एकोजीच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिधा भावांनी एकामागोमाग १७३६ पर्यंत राज्य केले, तुकोजीनंतर त्याचा पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आला; पण तो वर्षभरातच मृत्यू पावला. पुढे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह गादीवर आला (१७३९) व त्याने इंग्रजांशी सख्यत्व जोडून १७६३ पर्यंत सु. पंचवीस वर्षे राज्य केले. तुळजाजी हा त्याचा पुत्र. याची कारकीर्द भ्रष्टाचार, अनागोंदी, इंग्रजांचा चंचुप्रवेश, हैदरची स्वारी इ. कारणांमुळे खिळखिळी झाली. अगतिक होऊन अखेर त्याने इंग्रजांकडे कारभार सोपविला आणि त्यांचे मांडलिकत्व पतकरले. तुळजाजीनंतर ⇨दुसरा सरफोजी हा अल्पवयीन दत्तक पुत्र गादीवर आला. तो सज्ञान होईपर्यंत त्याच्या सावत्र काकाने (अमरसिंह) कारभार पाहिला. त्यानंतर सरफोजीने पस्तीस वर्षे (१८३२ पर्यंत) इंग्रजांच्या कृपेने राज्य केले. साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, चित्र इ. शास्त्रकलांचा तो भोक्ता असल्यामुळे त्याची कारकीर्द सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली. जिर्णोद्धारित बृहदीश्वर मंदिरातील भोसले वंशविषयक शिलालेख (१८०३) त्याच्याच कारकीर्दीत कोरला गेला. इंग्रजांनी त्याला राजा हा किताब देऊन त्याचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आणले होते. त्याच्या नंतर राजा शिवाजी १८३३ ते १८५५ पर्यंत गादीवर होता; पण प्रत्यक्षात कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला. शिवाजी निपुत्रिक वारल्यामुळे १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावर संस्थान खालसा केले. तंजावरचे बहुतेक राजे कलाभिज्ञ होते. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य आणि ग्रंथनिर्मिती यांना या घराण्याचा मोठा आश्रय होता. तंजावरचा मराठा दरबार हॉल आणि अनेक भाषांतील हस्तलिखितांनी समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय या दोन वास्तू म्हणजे तंजावर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. मराठी भाषेप्रमाणे तमिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांनाही या घराण्याचा चांगला आश्रय लाभला.

छत्रपती शिवाजींचा सुना

 1. येसूबाई भोसले : येसूबाई या मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. सम्भाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले. . तिथे आठ-नऊ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्याची गादी राखली. संताजी घोरपडे-धनाजी जाधव यांसारख्या रणशूरांनी गनिमी काव्याने मोगल फौजेस सळो की पळो करून सोडले; तथापि शत्रूचे पाशवी बळ ओळखून राजाराम शिताफीने महाराष्ट्रात निसटून आला व कारभार पाहू लागला; पण इथेही दुर्दैवाने त्याला घेरले व थोड्याशा आजारानंतर तो सिंहगडावर अकाली निधन पावला (१७००).
 2. राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते): राजारामाचे पश्चात राणी ताराबाईने आपल्या अल्पवयीन मुलास (शिवाजी) पन्हाळ्यास गादीवर बसविले व ती स्वतः हिंमतीने कारभार पाहू लागली. औरंगजेब बादशाह या काळात मराठ्यांच्या राज्यात ठाण मांडून बसला होता. त्याने आज सर केलेला किल्ला मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत घ्यावा, हा क्रम सतत चालू होता. ताराबाई शर्थीने प्रतिकार करून स्वराज्याचा लढा लढवीत होती. भद्रकाळी हे तिचे अभिधान सार्थ ठरले. वृद्ध औरंगजेब अखेर १७०७ मध्ये खुलदाबादेस मृत्यू पावला. त्याच्या पश्चात त्याच्या पुत्रांत बादशाहीच्या तख्तासाठी युद्धे झाली आणि मोगल सत्तेचा दरारा झपाट्याने ओसरू लागला. राणी येसूबाई आणि शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहूची सुटका केली (१७०७).

शाहूच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. जुने अनेक मातब्बर सरदार आणि मुत्सद्दी शाहूला मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे (१७०७) चुलती ताराबाई त्याच्या विरोधात उभी राहिली. आपला नवरा राजाराम व आपण स्वतः लढून स्वराज्य टिकविले, त्यावर शाहू हक्क सांगू लागला. म्हणून तिने त्याला तोतया ठरविले व आपला मुलगा राज्याचा खरा वारस असल्याचे जाहीर केले. सामोपचाराने हा गृहकलह मिटेना, तेव्हा उभयपक्षी खेड येथे लढाई झाली व तीत ताराबाईच्या फौजेचा पराभव झाला. यानंतर शाहू साताऱ्यास आला व त्याने छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला (जानेवारी १७०८). त्या वेळी ताराबाईने पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. १७१२ मध्ये तिचा मुलगा शिवाजी वारला. तिची सवत, राजारामाची दुसरी बायको राजसबाई हिने आपला मुलगा संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.

छत्रपती शिवाजीं नातवंडे

संभाजीचा मुलगा – छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९): शाहू मोगली छावणीत सोळासतरा वर्षे राहून आल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. पराक्रमाची ईर्षाही त्याच्या अंगी नव्हती. त्याचा स्वभाव ऐषारामी, नेमस्त, धार्मिक आणि प्रसंग निभावून न्यायचा असाच एकूण होता. मनुष्यस्वभावाची पारख मात्र त्याला उत्तम होती. बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या यत्नामुळे पातशाहीकडून त्याला स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले असले; तरी त्या हक्कांची अंमलबजावणी करताना आरंभीच्या काळात त्याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या मर्यादा तो जाणून असल्यामुळे अनेक गुणी व पराक्रमी माणसे त्याने आपलीशी केली आणि सु. चाळीस वर्षे सातारच्या गादीचे ऐश्वर्य व दरारा सर्वत्र वाढवला. या कामी बाळाजी विश्वनाथ आणि त्याचा पराक्रमी पुत्र पहिला बाजीराव हे दोन पहिले पेशवे, चिमाजीआप्पा, प्रतिनिधी, फत्तेसिंग भोसले, उदाजी चव्हाण, ⇨कान्होजी आंग्रेरघूजी मोसले, दाभाडे पितापुत्र आणि पेशव्यांच्या हाताखाली तयार झालेले पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार बंधू इ. अनेक कर्तृत्ववान मराठे सरदारांनी निष्ठायुक्त सेवा करून त्याचे राज्य विस्तारित करून वैभवास नेले. या सर्वांच्या पराक्रमामुळे मोगल, निजाम, पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज हे मराठ्यांचे शत्रू निष्प्रभ झाले.

शाहूच्या मोगल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे धोरण नांदा व नांदू द्या, या स्वरूपाचे होते. स्वतःचे अंगी कर्तबगारी नसली तरी शहाणपणाने पेशवा, प्रतिनिधी इत्यादींवर भिस्त ठेवून सर्वांच्या कर्तृत्वास तो संधी देत असे; पण या धोरणामुळे त्याच्या दरबारात एकवाक्यता व एकजूट राहिली नाही. पेशव्यांनी सर्वाना निष्प्रभ केले व प्रायः तेच राज्याचे सूत्रधार झाले. छ. शाहू १७४९ मध्ये निपुत्रिक वारला. त्याच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आला; पण रामराजापासून छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरे सत्ताधारी पेशवे झाले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा यत्न करून पाहिला; पण या गोष्टीस खुद्द शाहूनेच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातावास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना बारगळली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती.

पेशवाई संपुष्टात आणल्यानंतर इंग्रजांनी सातारच्या प्रतापसिंह भोसल्यास अभय देऊन गादीवर बसविले व आरंभी ग्रँट डफसारख्या प्रशासकास नेमून एकूण मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. ग्रँट डफचा मराठ्यांचा इतिहासविषयक महत्त्वाचा ग्रंथ याच्याच कारकीदींत लिहिला गेला. ग्रँट डफच्या शिकवणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्याधिकारी आहोत, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनी बळावू लागली. इंग्रजांना ही गोष्ट खपली नाही. प्रतापसिंहावर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजरकैदेत ठेवले. प्रतापसिंहानंतर त्याचा भाऊ शहाजी ऊर्फ आप्पासाहेब गादीवर आला; पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले (मे १८४८).

ताराबाईची राजारामाची मुले – दुसरा शिवाजी

राजसबाईची मुले – दुसरा संभाजी:  कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा पुत्र शिवाजी १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास (संभाजीस) कोल्हापूरच्या गादीवर बसविले (१७१४). हा संभाजी मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी लढाई झाली (१७३०) व तीत संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला (एप्रिल १७३१) व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरून काही वर्षेतरी गृहकलह थांबला. छ. संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली. पेशव्यांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरचे राज्य इंग्राजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर (१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षि ⇨शाहू महाराज (कार. १८८४-१९२२). त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यांमुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि संगीतकला जोपासली गेली, तीही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात सातारचे प्रतापसिंह आणि कोल्हापूरचे शाहू यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करावा लागतो.भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ मार्च १९४९ रोजी कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन झाले. शहाजी महाराज (दत्तक देवास घराणे) हे बारावे छत्रपती त्या वेळी गादीवर होते.

छत्रपती शिवाजीं पतवंडे :-

ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला. दुसऱ्या संभाजीचा मुलगा – द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

महाराजांचे पूर्वज आणि वंशज: करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच…व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.

छत्रपति कार्यकाळ १७०७-१७४९: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूरसातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.

छत्रपती प्रतापसिंह भोसले:  हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते विकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला मूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते[दाखवा]
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल ? प्रताधिकारमुक्त दस्तऐवज

 • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज – तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
 • ऐतिहासिक ललित साहित्य – संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
 • ऐतिहासिक कलाकॄती – समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.

सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले. तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसर्‍या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ ला दुसर्‍या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या.

पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.

Author- Prachi Patil.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *